व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी:दि.२२ आळंदी(हवेली) काळे कॉलनी निवारा हौसिंग सोसायटी येथे रात्री विद्युत रोहित्राच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली.शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची समजतास तत्काळ तेथील नागरिकांनी विद्युत पुरवठा
आधिकारी यांना संपर्क केला.
तसेच अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना ही संपर्क केला.
तत्काळ त्या भागातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी येऊन अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तेथील आग आटोक्यात आणली.
तेथील आग आटोक्यात आणण्यासाठी
सामाजिक कार्यकर्ते,स्थानिक नागरिक यांची मदत झाली.
या आगीत कोणतीही जीवितहानी व दुखापतीची घटना झाली नाही.
Discussion about this post