व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: दि.२२ आळंदी केळगाव रस्त्यावरील श्रीराम धर्मशाळा पिंपळगाव खडकी या नूतन वास्तू कार्यक्रम,
सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा व सत्कार समारंभ या कार्यक्रमा निमित्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नूतन श्रीराम धर्मशाळेत उपस्थित होते.
सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्या निमित्त ज्येष्ठ वडीलधाऱ्या मंडळींचा बाबुराव बांगर ,तुकाराम बांगर,शांताराम बांगर,दगडू पोखरकर,नारायण अरगडे यांचा गृहमंत्री दिलीप वळसे पा. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.धर्मशाळेच्या नवीन इमारतीसाठी योगदान लाभलेल्या व्यक्तींचा ही त्यांच्या हस्ते सत्कार येथे करण्यात
आला.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त,चाकण पोलीस सह आयुक्त, आळंदी पोलीस स्टेशन वरीष्ठ पोलीस निरीक्षक व आळंदी
ग्रामस्थ यांचा ही श्रीराम धर्मशाळेच्या वतीने त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पा. म्हणाले ज्यांनी आपली हयात गावच्या विकासासाठी व समाजाच्या विकासासाठी गावाच्या भल्यासाठी, आध्यात्मिक कार्यासाठी हयात घालवली त्यांचा सत्कार आपण येथे केला.त्यांच्या केलेल्या कामाबद्दल व कर्तृत्वाबद्दल एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्याचा काम येथे करण्यात आले.या ज्येष्ठ व्यक्तींना अजून दीर्घ आयुष्य लाभो माऊलींच्या चरणी प्रार्थना.
यावेळी अध्यक्ष आंबेगाव शिरूर रा.काँ.पा. चे मानसिंग भैय्या पाचुंदकर,आळंदीतील राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पा. डी. डी. भोसले पा. पुष्पाताई कुऱ्हाडे ,रुपालीताई पानसरे,संदेश तापकीर, काँगेस नेत्या मंगलाताई वेळकर ,अजित वडगांवकर,गौरी गोळे हे उपस्थित होते.
माऊली मंदिरास ही गृहमंत्री दिलीप वळसे पा. यांनी सदिच्छा भेट दिली.संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान तर्फे
श्रीफळ ,शाल,माऊलींची मूर्ती व ज्ञानेश्वरी देऊन पालखी सोहळा प्रमुख अॅड विकास ढगे पा. व विश्वस्त अभयजी टिळक यांच्या हस्ते गृहमंत्री दिलीप वळसे पा. यांचा सत्कार करण्यात आला.
Discussion about this post