व्हीएसआरएस मराठी न्युज –आपल्या देशात अनेक श्वानप्रेमी आहेत. तसेच अनेकजण आवड म्हणून कुत्रा पाळत असतात. जर तुम्हीसुद्धा कुत्रा पाळत असाल तर व्हा सावध. कारण कुत्रा पाळण्यासाठीही आता मोठा कर भरावा लागणार आहे.
कारण आग्रा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्थानिक उपविधी बनवून नोंदणी शुल्क निश्चित करण्याचा प्रस्तावही तयार केला होता. सोमवारी महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्पन्नाच्या बाजूवर चर्चा करताना महापालिकेने हा प्रस्ताव मांडला.
यामध्ये परदेशी जातीच्या मोठ्या कुत्र्याच्या नोंदणी शुल्कात वर्षाला एक हजार रुपये, लहान कुत्र्यासाठी ५०० रुपये आणि भारतीय जातीच्या कुत्र्याच्या नोंदणीसाठी १०० रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच श्वान चिकित्सालयाचे नोंदणी शुल्क प्रतिवर्ष 5000 रुपये, श्वान चिकित्सालय वसतिगृहासाठी 10000 रुपये आणि पाळीव प्राण्यांचे दुकान वार्षिक 3000 रुपये दराने निश्चित करण्यात आले होते.
Discussion about this post