व्हीएसआरएस मराठी न्युज –औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम बी. फार्मसीच्या प्रवेशाची प्रक्रिया सीईटी सेलकडून राबविली जात आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेच्या कामगिरीच्या आधारे प्रवेश दिले जातो. आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी, यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सीईटी सेलने घेतला आहे.
सुधारित प्रवेश वेळापत्रकानुसार सोमवार (ता.३१) पर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. ई-स्क्रुटीनी किंवा प्रत्यक्ष स्क्रुटीनी यापैकी कुठल्याही एका पद्धतीद्वारे कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत मुदत असेल.
३ ऑगस्टला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, तक्रार किंवा हरकती नोंदविण्यासाठी ४ ते ६ ऑगस्ट अशी मुदत असेल. ८ ऑगस्टला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.
बी. फार्मसी डी. फार्मसी.
* पहिल्या कॅप राउंडची नोंदणी ९ ते ११ ऑगस्ट १ ते ३ ऑगस्ट
* निवड यादीची प्रसिद्धी १४ ऑगस्ट ५ ऑगस्ट
* प्रवेश निश्चितीची मुदत १७ ते १९ ऑगस्ट ६ ते ९ ऑगस्ट
* दुसऱ्या कॅप राउंडची नोंदणी २१ ते २३ ऑगस्ट १२ ते १६ ऑगस्ट
* निवड यादीची प्रसिद्धी २५ ऑगस्ट १८ ऑगस्ट
* प्रवेश निश्चितीची मुदत २६ ते २८ ऑगस्ट १९ ते २२ ऑगस्ट
Discussion about this post