व्हीएसआरएस मराठी न्युज –डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनेबाबत पालिका भवनात आयुक्त सिंह यांनी आढावा बैठक घेतली.
आयुक्त म्हणाले की, डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. डासांची उत्पत्ती होणारी स्थळे प्राधान्याने नष्ट करा. अधिक पथके नेमून डासोत्पत्ती ठिकाणे नष्ट करून डासोत्पत्ती करणार्या ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव- करा. पथकांमध्ये आवश्यक मनुष्यबळ वाढवून शहरातील औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, हाउसिंग सोसायटी, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह विविध भागांची नियमितपणे तपासणी करा. जनजागृती करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. हाउसिंग सोसायट्यांच्या प्रतिनिधींसमवेत प्रभागस्तरावर बैठक घेऊन माहिती द्या.
रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील 200 घरात पर्यवेक्षण तसेच, परिसरात औषध फवारणी, औष्णिक धुरीकरण, कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालय व दवाखान्यांमध्ये डेंगीच्या तपासणीसाठी आवश्यक रॅपिड कीट उपलब्ध करून देण्यात आले असून, वायवीएम रुग्णालय येथे निश्चित निदान करण्यासाठी सेंटीनल सर्वेक्षण सेंटर कार्यरत आहे. शहरात अद्याप डोळे येण्याची साथ पसरली नसली तरी वैद्यकीय विभागाने इतर विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, यशवंतराव चव्हाण स्मृती (वासीएम) रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, क्षेत्रीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post