व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्य सरकार, उर्जा मंत्री, कंपनी प्रशासन, यांच्या दुर्लक्ष्या मुळे राज्यभरात ऊर्जा खात्यातील वीज कंत्राटी कामगार त्रस्त आहेत. शासनाचे दुर्लक्ष त्यामुळे प्रशासन मस्त अशी अवस्था तिन्ही वीज कंपन्यात झाली आहे. कंत्राटदार देखील मनमानी कारभार करू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्यायमिळवून देण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) च्या वतीने रिजनल डायरेक्टर महावितरण कंपनीच्या कार्यालय समोर, सेनापती बापट रोड पुणे येथे लाक्षणिक उपोषण केले.
संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, भामसंघ अध्यक्ष अर्जुन चव्हाण, सातारा प्रतिनिधी दिलीप शिंदे, निखिल टेकवडे व महावितरण प्रशासनाच्या वतीने उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीश काटकर, उपस्थित होते. कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतीत शासनाने दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हांमध्ये उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी झालेल्या जाहीर सभेत बोलताना दिला आहे.
Discussion about this post