व्हीएसआरएस मराठी न्युज –पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दंड थोपटले असून भाजपला जागा दाखविण्यासाठी सज्ज असल्याचे आघाडीने जाहीर केले आहे.
दोन्ही निवडणुका एकत्र लढविण्याची घोषणाही महाविकास आघाडीने केली आहे. यासंदर्भातील माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
भाजपच्या विरोधात भक्कमपणे उभे राहण्यासाठी धोरण आखण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. यात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आला तो म्हणजे आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुक एकत्र लढविण्याचा. खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही पक्षांचे एकत्र निवडणुक लढविण्यावर एकमत झालेले आहे. भाजपला त्यांची जागा दाखविण्यासाठी एकत्र लढण्याचा निर्णय झाल्याचे चे म्हणाले.
भारतात सध्या धर्म आणि जातीवर राजकारण सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी जात, धर्म सांगावा लागत आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेला त्यांचा महाराष्ट्र धर्म दाखवावा लागणार आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि हिंदुत्व याच्याशी आम्ही कधीही समझोता करणार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
Discussion about this post