व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी (ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
मंगळवारी पहाटे सुमारे अडीच वाजता विठ्ठल रुक्मिणी चौकात महावीर ज्वेलर्स दुकानात शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची घटना घडली. ज्वेलर्स दुकानाच्या शटर मधून धूर येत असताना चे दिसताच तत्काळ पोलीस विभागाने अग्निशमन दल विभागाशी संपर्क साधून ती माहिती त्यांना दिली.
माहिती कळताच अग्निशमन दल गाडी पाच मिनिटांत च घटनास्थळी आल्याने तत्काळ आग विझवण्यात यश मिळाले. अशी माहिती अग्निशमन दल कर्मचारी विलास पवार यांनी दिली.तसेच महावीर ज्वेलर्स यांना संपर्क साधला असता त्यांनी मा. नगरसेवक सागर बोरुंदीया,थोरात साहेब,प्रसाद बोराटे,पोलीस प्रशासन, अग्निशमन दल कर्मचारी ,विद्युत विभाग कर्मचारी निकम यांचे वेळीच सहकार्य लाभले असे सांगितले.दुकानाचे थोडेफार नुसकान झालेचे कळते. वेळीच दुकानातील माल साहित्य बाहेर काढण्यासाठी यश मिळाले.त्यामुळे पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली.अग्निशमन दलाचे कर्मचारी विलास पवार व अक्षय त्रिभुवन यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली.जीवितहानी व दुखापत कोणतीच झाली नसल्याचे कळते.
यावेळी स्थानिक नागरिक उपस्थित होते.पंधरा दिवसाच्या आत आळंदी शहरात विविध ठिकाणी आग लागण्याची तिसरी घटना आहे. अन्नपूर्णा माता नगर मध्ये कार उष्णतेच्या तीव्रतेमुळे ,गावठाणात धर्मशाळेत
फ्रीज शॉर्ट सर्किटमुळे तर पहाटे ज्वेलर्स च्या दुकानात ही आग शॉर्ट सर्किट च्या कारणामुळे लागल्याचे कळते.ह्या घटना पाहाता घरात व ईतर ठिकाणी आग लागल्यास नागरिकांनी तत्काळ काय करावे ?यासाठी नगरपरिषदेकडून सूचना ,मार्गदर्शन तसेच याविषयीची जनजागृती ची गरज सध्या भासत आहे.
Discussion about this post