व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 पर्यंत देशाचे शिक्षण मंत्री म्हणून काम केले. 2008 मध्ये, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने त्यांचा वाढदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त एक वेगळी थीम जारी केली जाते. या वर्षी राष्ट्रीय शिक्षण दिन 2022 ची थीम “अभ्यासक्रम बदलणे आणि शिक्षण बदलणे” आहे.
पिंपरी महानगरपालिका भवनात जयंती निमित्त अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, वसिम कुरेशी आदी मान्यवर यांनी मौलाना यांना अभिवादन केले.
Discussion about this post