व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने थकबाकीदारांची वसुली कार, फ्रिज, टीव्ही उचलून करण्याचा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा. या साठी आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र वाघ यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी आम आदमी पार्टीचे संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, डॉक्टर अमर डोंगरे, आप नेते के.टी बारापत्रे, आप प्रवक्ते प्रकाश हागवणे, सिताताई केंद्रे, युवा नेते कमलेश रानावरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
निवेदना मध्ये असे म्हटले आहे महानगरपालिका प्रशासनाने ज्या निवासी मालमत्ता मध्ये नागरिक वास्तव्य करतात अशा थकबाकीदारांकडे थकबाकी आहे अशा निवासी मालमत्तांची जंगम मालमत्ता म्हणजेच कार ,टीव्ही, फ्रिज, आधी वस्तू जप्त करण्याची धडक कारवाई महापालिके मार्फत याच आठवड्यात करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे, शास्तीकर कोरोना महामारीच्या कालावधीततील जास्त आहे.
कोरोना महामारीमुळे सर्व जग ठप्प झाले होते लोकांची खाण्याची भ्रांती होती गोरगरिबांच्या हाताला काम नव्हते आता कुठेतरी परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे उद्योग, धंदे सुरू होत आहेत लोकांच्या हाताला काम मिळत आहे त्यातच महापालिका प्रशासनाने आडमुठी भूमिका जाहीर केली आहे.थकीत कर वसुलीसाठी लोकांच्या घरातील फ्रिज, कार, टीव्ही, अशा घरगुती वस्तू जप्त करण्यात चा फतवा पालिकेने काढला हा निर्णय अतिशय चुकीचा व संतापजनक आहे .
शहरातील रहिवाशांचा अवमान करणार आहे.सावकारी वसुली करून पालिकेचे उत्पन्न वाढविणे कोणत्या तत्त्वात बसते. समुपचराने कर वसुली झाली पाहिजे. या निर्णयाला तत्काळ स्थगिती द्यावी. त्याची अंमलबजावणी करू नये अन्यथा आम आदमी पार्टीकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल.
Discussion about this post