व्हीएसआरएस मराठी न्युज –किशोर आवारे हत्या प्रकरणात चार मुख्य आरोपी आणि एक मदत करणारा सहआरोपी असे एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले आहेत.पैकी चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.घटनेनंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसणारा एक जण पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने तीन जणांना शनिवारी (ता.१३) पहाटे ताब्यात घेतले आहे. एका आरोपीचा पथकामार्फत शोध चालू आहे.शाम निगडकर,संदीप मोरे,रघु धोत्रे आणि आदेश धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची संख्या आणखी वाढू शकते असे,दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.
Discussion about this post