व्हीएसआरएस मराठी न्युज –आधीच आर्थिक संकटात असलेल्या या एअरलाइन्स पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे.
तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.
गो फर्स्ट एअरलाइन्सकडे कार्यरत असणाऱ्या त्यांच्या सर्व विमानांची माहिती मागितली आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी देखील गो फर्स्टने लवकरात लवकर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गो फर्स्टने त्यांची 30 मे पर्यंतची सर्व विमानं रद्द करण्याची घोषणा केली. सुरुवातील फक्त दोन दिवसांसाठी विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली होती, मात्र आता ही उड्डाणं 30 मे पर्यंत रद्द करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
Discussion about this post