व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –भोपाळ येथे सुरु असलेल्या ओपन नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्राच्या संघाला सुवर्णपदक मिळाले. महाराष्ट्राच्या संघात पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस नाईक रश्मी धावडे यांचा समावेश आहे.
रश्मी धावडे यांच्यासह तीन महिलांच्या संघाला नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक मिळाले आहे.
ओपन महाराष्ट्र शूटिंग स्पर्धा मुंबई येथे ६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत झाली. या स्पर्धेत पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस नाईक रश्मी स्वप्नील धावडे यांनी ५० मीटर (०.२२ बोर) फ्री पिस्टल प्रकारात कांस्य पदक मिळविले. त्या विजयामुळे त्यांची भोपाळ येथील स्पर्धेसाठी निवड झाली. मध्य प्रदेश मधील भोपाळ येथे नॅशनल राइफल एसोसिएशनने आयोजित केलेली ओपन नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीप २०२२ ही स्पर्धा २० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत सुरु आहे. ५० मीटर फ्री पिस्टल स्पर्धा प्रकारात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या पोलीस नाईक रश्मी धावडे, औरंगाबाद येथील गीता म्हस्के आणि पुणे येथील ऋतुजा बडदे यांनी सांघिक सुवर्ण पदक मिळवले आहे.
Discussion about this post