व्हीएसआरएस मराठी न्युज –हातभट्टी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी सापळा रचून पकडला. यामध्ये आठ लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. वाकड पोलिसांनी काळखडक येथे ही कारवाई केली.
सहायक फौजदार बिभीषण कन्हेरकर यांना माहिती मिळाली की, काळाखडक येथून दारूची वाहतूक करणारा टेम्पो चिंचवडच्या दिशेने जाणार आहे. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून टेम्पो पकडला. टेम्पोची झडती घेतली असता पोलिसांना त्यामध्ये गावठी हातभट्टी दारूचे एकूण 36 मोठे कॅन मिळून आले आहेत. आरोपीने ही गावठी दारू लोणी काळभोर येथून आणल्याचे तपासात समोर आले आहे. सहायक निरीक्षक संतोष पाटील, अंमलदार बिभीषण कन्हेरकर, राजेंद्र काळे, राजेंद्र मारणे, वंदू गिरे, दिपक साबळे, प्रमोद कदम, प्रशांत गिलबीले, अतिक शेख, तात्या शिंदे, भास्कर भारती यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
संदीप रामकिशोर सरोज (45, रा. कुदळवाडी, मुळ रा. इलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Discussion about this post