व्हीएसआरएस मराठी न्युज –शहरात वाढणार्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनचालक बीआरटी मार्गाचा वापर करत असल्याचे निदर्शनास येत आहे, अशा वाहनचालकांवर वाहतूक पोलिस विभागाने कारवाई केली आहे. ही कारवाई सन 2022-23 या कालावधीत देहूरोड पोलिस स्टेशन, भोसरी पोलिस स्टेशन, निगडी पोलिस स्टेशन, चिंचवड पोलिस स्टेशन, सांगवी पोलिस स्टेशन, पिंपरी पोलिस स्टेशन, विमाननगर पोलिस स्टेशन अंतर्गत करण्यात आली आहे.
बीआरटी मार्गात घुसखोरी करणार्या तब्बल 17 हजार 193 वाहनांवर वाहतूक पोलिस विभागाने कारवाई केली आहे. त्याद्वारे 28 लाख 82 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पीएमपीने ताफ्यातील बस ये-जा करण्यासाठी शहरात सात मार्गांवर बीआरटी मार्ग उभारले आहेत.
Discussion about this post