व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचे शनिवार, 19 नोव्हेंबर रोजी उद्घाटन झाले.
उद्घाटन प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यवान माने, दीपक नामदेव गायकवाड सहायक पोलीस उपनिरीक्षक, वाकड पोलीस स्टेशन, चंद्रशेखर कदम, मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव, शशिकांत जगताप, प्रशासन अधिकारी, ग प्रभाग, अनिल जगताप, क्रीडा पर्यवेक्षक व स्पर्धा प्रमुख, विजय रणझुंजारे पंचप्रमुख इत्यादी उपस्थित होते.
स्पर्धा उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुल्ला व चौगुले अंजली यांनी आभार प्रदर्शन केले. स्पर्धा रायफल शूटिंग सेंटर थेरगाव थेरगाव माध्यमिक विद्यालय येथे 19 ते 20 नोव्हेंबर 2022 अशा दोन दिवस होणार आहेत .
या स्पर्धे साठी बाळाराम शिंदे, क्रीडा शिक्षक, सुनील ओव्हाळ, क्रीडा शिक्षक, वैशाली साळी, क्रीडा शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. उत्साह पूर्व वातावरणात पालक खेळाडू यांचे समवेत उद्घाटन समारंभ पार पडला. एकूण 71 शाळा व 175 खेळाडू सहभाग घेतला आहे.
Discussion about this post