व्हीएसआरएस मराठी न्युज -शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने गोवंश-2022 प्रदर्शनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
27 ते 29 मे या कालावधीत गोवंश-2022 प्रदर्शन आयोजित केले आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल असेही यावेळी पवार म्हणाले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राची देशात वेगळी ओळख आहे. या केंद्राच्या माध्यमातून देशी गोवंशाच्या संवर्धनाचे चांगले कार्य सुरु आहे. राज्यातील विभागनिहाय वेगळे वातावरण आहे. यामध्ये कोणत्या विभागात कोणत्या गाईचे पालन करावे, याबाबत या केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे चांगले काम झाले आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून प्रत्येक विभागात गोवंश प्रदर्शनाचे आयोजन करावं, अशी सूचना देखील पवार यांनी केली.
आपल्या संस्कृतीत देशी गाईला अन्यन्यसाधारण महत्व आहे. देशी गायींचे गोमुत्र, शेण, सेंद्रीय खत, तुप, दूध, खवा यांनाही वेगळे महत्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने देशी गायींच्या दुधापासून तयार केलेले पदार्थ लाभदायक आहेत. शेतकरी कुटुंबात समृद्धी आणण्याचे काम गोवंशाने केले आहे. त्यामुळे ही संस्कृती जपण्यासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
गोवंश व गोपालन अशी दोन्ही बाबींची प्रयोगशील शास्त्रोक्त माहिती देणाऱ्या या प्रदर्शनात साहिवाल, थारपारकर, रेड सिंधी, राठी, गीर या अस्सल देशी दुधाळ गोवंशाबरोबरच खिलार, देवणी, लाल कंधारी, डांगी, गवळाऊ, कोकण कपिला असे महाराष्ट्रीयन गोवंश आहेत. पशुपालनातील नवीन तंत्र, दुध प्रक्रिया उद्योग,पशुखाद्य निर्मिती,चारा पिके, विविध अवजारांची माहिती या गोधन प्रदर्शनात मिळणार आहे.
Discussion about this post