व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलची स्थापना २० जुलै १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. शाळा यावर्षी हिरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्त वर्षभरात शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज दि. २१ डिसेंबर, २०२३ इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण समारंभ कामगार नेते व माजी विद्यार्थी डॉ.कैलास कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर,विद्यार्थी प्रतिनिधी निखिल साबळे,आर्या मोटे,कार्याध्यक्ष रमेश गाढवे,उप कार्याध्यक्ष श्वेता नाईक,अशोक थोरात, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे आणि शिक्षक, शिक्षिका तर कर्मचारी,पालक, माजी विद्यार्थ्यी उपस्थित होते.
Discussion about this post