व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील बालरोग विभागात बालरोग अतिदक्षता (आयसीयू) विभागाच्या 5 बेड (पीआयसीयू) बुधवारी (दि.7) कार्यान्वित करण्यात आले.
या वाढीव बेडमुळे गंभीर आजारी असलेल्या बालकांवर उपचार करणे सुलभ होणार आहे. बालरोग विभागांतर्गत आयसीयूमधे 25 बेड (एनआयसीयू) नवजात अर्भकाकरिता या आधीच कार्यान्वित आहेत.
या वाढीव 5 बेडमुळे गोरगरीब अतिजोखिम आजारांनी ग्रासलेल्या 1 ते 12 वर्ष वयोगटातील बालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Discussion about this post