२८५ जागांसाठी गुरूवारी ८५० जणांनी अर्ज दाखल केले.
व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांसाठी सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षकांच्या जागा सरळ सेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
प्रत्येकी सहा महिन्यांसाठी असणाऱ्या या जागांवर निवड होणाऱ्या शिक्षकांना २० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. पिंपरीतील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत याबाबतचे अर्ज गुरूवारी स्वीकारण्यात आले. शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले की, दोन्ही पदे मिळून २८५ जागा आहेत. गुरूवारी ८५० अर्ज दाखल झाले आहेत. अर्जांची छाननी सुरू केली आहे. १० दिवसांमध्ये याबाबतचा निकाल जाहीर केला जाईल.
Discussion about this post