व्हीएसआरएस मराठी न्युज –मेट्रोचे विस्तारित मार्ग सुरू करण्याचा १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकला आहे. आता महामेट्रोकडून दोन्ही विस्तारित मार्गांवरील काम पूर्ण करण्यात आले आहे.
या दोन्ही विस्तारित मार्गांची मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी सुरू असून, आयुक्तांनी हिरवा कंदील दिल्यानंतर या मार्गांवर सेवा सुरू होईल, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.सध्या मेट्रोची सेवा दोन मार्गांवर सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग ६ मार्च २०२२ रोजी प्रवाशांसाठी सुरू झाले. त्यानंतर फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल स्थानक या एकूण १२ किलोमीटरच्या विस्तारित मार्गांचे काम पूर्ण झाले आहे.
Discussion about this post