व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी -आकुर्डी, ४ ऑगस्ट बीना एज्युकेशनल सोसायटीच्या ‘मुखतरुन्निसा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स’ आणि ‘नूर अॅकॅडमी फॉर पॅरामेडिकल’ या संस्थांचे उद्घाटन शाहिद लतीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन बीना एज्युकेशनल सोसायटी, पांढरकर नगर, आकुर्डी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ जागृती धर्माधिकारी, बिना एज्युकेशनल सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष इक्बाल खान, सचिव आझम खान, संचालक हमजा खान, अकमल खान, मौलाना अबुल गफ्फार, मौलाना सैफी, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, मुफ्ती अब्दुल आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका समिना मोमीन यांनी बीना एज्युकेशनल सोसायटीच्या प्रगतीची व भविष्यातील उद्दिष्टांची माहिती दिली. इक्बाल खान यांनी बीना एज्युकेशनल सोसायटीबाबत मनोगत व्यक्त केले.
यावेळी अब्दुल सलाम इनामदार, गुलाम मोहम्मद शेख यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘उड्डाण’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. बीना एज्युकेशनल सोसायटीच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सूत्रसंचालन शाहीन वाधवा यांनी केले. आभार प्रदर्शन हेरा खान यांनी केले.
Discussion about this post