व्हीएसआरएस मराठी न्युज -कलारंग सांस्कृतिक कला संस्थेचा ‘कलागौरव’ पुरस्कार अभिनेता चिन्मय मांडलेकर यांना जाहीर झाला आहे.
यावेळी त्यांची मुलाखत अभिनेते राहुल सोलापूरकर घेतील. तसेच, त्यांच्यासह शहरातील लेखक आकाश थिटे, कलाकार रश्मी घाटपांडे, संगीतकार तेजस चव्हाण, अभिनेत्री प्रगल्भ कोळेकर, गायक निषाद सोनकांबळे व रवींद्र कांबळे यांनाही कलागौरव पुरस्काराने सन्मानित केले जाईल.
माजी मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. शनिवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कार्यक्रम होईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली.
Discussion about this post