व्हीएसआरएस मराठी न्युज –खुशी मुल्ला या महिला क्रिकेट खेळाडूची महाराष्ट्राच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. या निमित्ताने खुशी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस भेट दिली. त्यादरम्यान त्यांचा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
त्यावेळी ते बोलत होते. सत्काराच्या वेळी क्रिडा अधिकारी अनिता केदारी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, व्हेरॉक (Kalewadi) वेंगसरकर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक शादाब शेख तसेच खुशी मुल्ला यांचे वडील नवीलाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते संजय गायके आदी उपस्थित होते.
खुशी मुल्ला यांनी थेरगाव येथील व्हेरॉक वेंगसरकर अकादमी येथे 10 वर्षांपुर्वी प्रवेश घेऊन क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. त्यांनी 16 वर्षाखालील, 19 वर्षाखालील, 13 वर्षाखालील गटात महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रतिनिधीत्व केले, त्यांना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शनही लाभले आहे.
वेराॅक वेंगसरकर अकादमीचे क्रिकेट प्रशिक्षक शादाब शेख यांनी बोलताना महानगरपालिकेने क्रिकेट खेळासाठी प्रशस्त मैदान तसेच सरावादरम्यान पावसाने व्यत्यय येऊ नये यासाठी बंदिस्त इनडोअर हॉल उपलब्ध करून दिल्यामुळे सराव करण्यास सुलभता निर्माण झाली.
Discussion about this post