व्हीएसआरएस मराठी न्युज –विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद दुसऱ्या क्रमांकाचे आमदार असलेल्या काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे जाईल, असे सूचित केले होते.
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे येण्याची शक्यता असून, त्यासाठी पक्षातील काही नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांची भेट घेतली.
Discussion about this post