व्हीएसआरएस मराठी न्युज –प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी अजित पवार गेले. ही भेट कौटुंबिक असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. आजच अजित पवार यांच्या नव्या दालनात शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला. त्यामुळे हा विषय सुध्दा चर्चेत असतांना अचानक सिल्व्हर ओकवर केल्यामुळे अनेकांनी त्याचा राजकीय अर्थ काढला. पण, त्यानंतर ही भेट कौटुंबिक असल्याचे समजल्यानंतर त्यामागील कारणही पुढे आले.
अजित पवार यांनी याअगोदरही शरद पवार आजही आपल्यासाठी सर्वोच्च स्थानी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राजकीय विरोध असला तरी कौटुंबिक नाते या विरोधानंतरही जपले जाणार असल्याचे संकेत या भेटीमुळे स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post