Maharashtra : छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर मधील वाळूंज एमआयडीसीत सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये असलेल्या ‘सनशाइन इंटरप्राईजेस’ या मोजे बनविणार्या कंपनीला दि. ३१ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत कंपनीत काम करणार्या ६ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृत कामगार बिहार राज्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन व्यक्तींची नावे कळू शकली नाहीत. त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला असल्याचे कळते.
या कंपनीत १५ कामगार काम करतात. त्याशिवाय एक महिला आणि दोन लहान मुलेही तेथे होती. या पैकी बहुतेक बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील मिर्झापूर परिसरातील आहेत. एक पश्चिम बंगाल येथील असून एक स्थानिक आहे.
कंपनीतील काम ताबल्यानंतर रात्री १२ च्या सुमारास सर्व कामगार झोपी जेले. त्यानंतर कंपनीला आग लागली. आच जानवल्याने काही कामगारांना जाग आली. त्यांनी सर्वांना झोपेतून जागे केले.दरवाजासमोरच आग लागल्याने काही कामगारांनी पत्र्यावर चढून बाहेर पडण्याचा प्रयत्न केले. या प्रकारे चौघे बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तेथे पोहोचले. आग विझवण्याचे काम सुरू आहे.
Discussion about this post