Maharashtra : मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पूर्वी पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे.
महासंचालक रजनीश शेठ निवृत्त झाल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने तीन अधिकार्यांची नावे या पदासाठी पाठविली होती. त्यापैकी रश्मी शुक्ला यांच्या नावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहमती दर्शविल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post