व्हीएसआरएस मराठी न्युज –राणी लक्ष्मीबाई यांच्या विचारांची जागृती करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील श्री गणेश व्यायाम मंडळाच्यावतीने शनिवारी (ता. १९) मणिकर्णिका मशाल दौडचे आयोजन करण्यात आले होते.
यात पाच मुलींनी तब्बल ३७ किलोमीटर दौड मारली.
भक्ती दहिफळे, श्वेता लिमण, नेत्रा ढगे, अस्मिता खाडे, सायली घाडगे या मुलींनी ही दौड मारली. किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी प्रारंभ करून, कात्रज-स्वारगेट- सारसबाग गणपती मंदिर-दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरमार्गे पुण्यातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ मशाल दौडची सांगता करण्यात आली. पुण्यात प्रथमच अशा प्रकारच्या मणिकर्णिका मशाल दौडचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष संजय शेलार, अक्षय खानविलकर, आरती मल्ला यांनी संयोजन केले.
Discussion about this post