व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्य सरकारने उद्या, शुक्रवारी ईद-ए-मिलादची शासकीय सुटी जाहीर केल्याने मंत्रालय सलग पाच दिवस बंद राहणार आहे. अनंत चतुर्दशीमुळे ईदची सुटी एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे.
शासकीय कार्यालये 5 दिवस बंद
28.9.2023 अनंत चतुर्दशी
29.9.2023 ईद-ए-मिलाद
30.9.2023 शनिवार
1.10.2023 रविवार
2.10.2023 महात्मा गांधी जयंती
पाच दिवसांच्या आठवड्यामुळे अनेक सरकारी कार्यालये शनिवार, रविवारी बंद असतील. साेमवारी गांधी जयंतीची सुटी आहे. त्यामुळे थेट पाच दिवसांनंतर म्हणजेच मंगळवारी सरकारी कार्यालये सुरू हाेतील.
Discussion about this post