व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -आमदार लोककल्याण निधीतून तब्बल 111 सोसायट्यांना पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
आमदार लोककल्याण निधीतून आतापर्यंत 111 सोसायटिंना पेव्हिंग ब्लॉक बसवून दिले आहेत. तसेच, एफ पाच शिवतीर्थ, ए 20 लक्षपूर्ती, डी 17 शिवरत्न आणि डी 20 शिवमुद्रा या चार सोसायट्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान, परिसरातील सोसायटींचा परिसर सुशोभित करुन रहिवाशांसाठी चांगले वातावरण करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते निलेश नेवाळे यांनी पुढाकार घेतला असून, स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Discussion about this post