Mumbai News : मुंबई : मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात उपोषण करण्यास मनोज जरांगे पाटील यांना परवानगी नाकारली आहे. तशा आशयाची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
खेळासाठी राखीव असलेल्या आझादमैदानात उपोषण करण्यास परवानगी नाही. कारण त्यातील ७ हजार स्क्वेअर मीटर इतकेच क्षेत्र आंदोलनासाठी उपलब्ध होऊ शकते. त्यात केवळ पाच ते सहा हजार व्यक्ती सामावल्या जाऊ शकतात. आणि आंदोलकांची संख्या पाहता हे मैदान अपुरे पडणार आहे. शिवाय नोकरी आणि व्यापार उदिमानिमित्त रोज सुमारे ५० ते ६० लाख लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी येत जात असतात. त्यासर्वांवर इतक्या मोठ्यासंख्येने आंदोलक आल्यास परिणाम होऊ शकतो असे कारण या नोटीसीत दिले असल्याचे समजते.
आंदोलकांनी नव्या मुंबईतील खारघर येथे असलेले सेक्टर २९ मधील मैदान पोलिसांनी सुचविले आहे. तेथेही आंदोलन करण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी. दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे. तसेन केल्यास सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचा अवमान होईल याची नोंद घ्यावी असेही या नोटीसीत म्हटले आहे.
दरम्यान पोलिसानी परवानगी नाकारली तरी आंदोलकांनी आम्ही पूर्वीच पत्रव्यवहार करून आंदोलनासाठी परवानगी मागितली होती असे स्पष्ट करत तेथे व्यासपीठ उभारण्याची तयारी केली आहे.
Discussion about this post