व्हीएसआरएस मराठी न्युज -इयत्ता 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थीनींना सायकल घेण्यासाठी 7 हजार रुपये अर्थसहाय्य, सामाजिक संस्थांना सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी 25 हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे. लोकनायक गोपीनाथ मुंडे 12 वी नंतरचे प्रथम वर्ष वैद्यकीय योजनेंतर्गत (एम .बी. बी. एस/ बी. ए. एम. एस / बी. एच. एम. एस / बी. डी. एस / बी. यु. एम. एस)
बी.आर्किटेक्चर / बी. पी. टी. एच / बी. फार्म / बी. व्ही. एस. सी आणि अभियांत्रिकी पदवी परीक्षा यांसारखे उच्च शिक्षण घेण्यासाठी 25 हजार रुपये तर रामभाऊ म्हाळगी योजनेंतर्गत मुलींना तांत्रिक प्रशिक्षण किंवा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी आय. टी. आय विद्यार्थ्यांना 3 हजार रुपये आणि अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांना 7 हजार 500 रुपये तसेच महाराष्ट्र राज्य मंडळ (एस.एस.सी बोर्ड ) अंतर्गत शाळांमधील इयत्ता 10 वी मधील मुलींना शैक्षणिक साहित्य घेणेकामी 6 हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post