व्हीएसआरएस मराठी न्युज-आळंदी दि.७(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदीतील काही पथदिवे मधूनच बंद अवस्थेत आढळतात. त्याची तक्रार केल्यावर अथवा एखाद्या सोशल मीडिया ग्रुपवर तेथील फोटो व्हायरल झाल्यावर किंवा त्या संबंधीत वृत्त प्रसारीत झाले की लगेच काही दिवसात बंद पडलेले पथदिवे चालू होतात.
हे आळंदी शहरात सातत्याने दिसून येणारे चित्र आहे.मरकळ रोड राजगुरूनगर बँक ते के के हॉस्पिटल काही पुढील भागा पर्यंत च्या एका बाजूचे फुटपाथ वरील पथदिवे काल रात्री चालू नव्हते,
भागीरथी नाला येथील शौचालयासमोरील,जुना पूल ते देहू फाट्या पर्यंत काही ठिकाणी पथदिवे चालू नसल्याचे सातत्याने
दिसत आहे. नवीन पुलावर एका बाजूने सर्व पथदिव्यांच्या खांबावर
विद्युत माळा सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने केले आहे तर त्याच पुलाच्या दुसऱ्या बाजूवरील पथदिवे बंद अवस्थेत आढळून येत आहे. नगरपालिकेच्या समोरच पूल व देहूफाटा कडे जाणारा रस्ता त्यावरील रस्ता दुभाजकावरील पथदिवे बंद असून सुद्धा याकडे पालिकेचे दुर्लक्ष दिसून येते.आळंदी पोलीस स्टेशन समोरील एक
पथदिव्याचा खांब पडून बरेच दिवस झाले असून तो अजूनही उभारलेला दिसत नाही.अजून विविध काही भागात,गल्लींमध्ये विद्युत दिवे बंद अवस्थेत आढळतात.याकडे ही पालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे.
Discussion about this post