व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -मुंबईतील इस्लाम जिमखान्यात रोजा इफ्तार पार्टी पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, छगन अन्न व नागरी पुरवठा भुजबळ गृहनिर्माण मंत्री, जितेंद्र आव्हाड,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,आदीती तटकरे, ऍड माजिद मेमन,खासदार सुनील तटकरे यासह मुस्लिम धर्मातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना शरद पवारांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
‘लोकांमध्ये, समाजात भांडणे लावणे हे योग्य नाही. पोलिसांच्या विरोधात आरोप केले जातात. वातावरण बिघडवन्याचा प्रयत्न सुरू आहे. मागच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक आहे.
आज देशात खासकरून राज्यात आणि दिल्लीत एक प्रकारचा माहोल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी काम काही राजकीय नेते करत आहे, असं म्हणत शरद पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. (लाऊडस्पीकरचा शोध कधी लागला? कोणत्या मशिदीत प्रथम अजान देण्यात आली?) तसंच, कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार, पण लोकांना बोलवणे आणि आपसात भाईचार संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही’ असा टोलाही शरद पवारांनी राज ठाकरेंना लगावला. ‘देशाच्या राजधानीत दिल्लीत एक प्रकारचा वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असले तरी कायदा व सुव्यवस्था केंद्रसरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले. आपसातील भाईचारा कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही’ अशी खंतही पवारांनी व्यक्त केली.
‘समाजातले वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतो आहे. राज्यातील जनता ज्याप्रकारे हिंदू हो या मुसलमान ख्रिश्चन यांनी भाईचारा टिकवण्यासाठी प्रयत्न करावे. शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्याकडून केला जातोय त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. दिल्लीत जे झालं ते चांगलं झालं नाही.
दिल्लीत हल्ले झाले, घरे देखील पाडण्यात आली. अशीच परिस्थिती आपल्या राज्यांत तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे, अशी टीकाही पवारांनी केली. (‘…तर मग हिंदीत तुमचे चित्रपट डब का करता?’ साऊथ सुपरस्टारला अजय देवगणने सुनावलं) ‘कोरोनाची परिस्थिती होती म्हणून आपल्याला मागच्या वर्षांत इफ्तार पार्टी साजरी करता आली नाही. मला आनंद आहे की दोन वर्षे जगात कोरोनाचे सावट आले होते.
पण आज रोजाचा उत्सव साजरा करायला मिळाला नाही. लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज कोरोना समस्या कमी झाली आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रोजा इफ्तार स्वीकारला आहे, असं पवार म्हणाले.
Discussion about this post