व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड शहरातील निगडी येथील अभिश्री राजपूत यांची श्रीलंका येथे २६ ते ३१ ऑगस्ट २०२३ दरम्यान होणाऱ्या युथ एशियन योगा गेम्ससाठी “भारतीय संघाची कोच” म्हणून निवड झाली आहे.
तसेच माजी सैनिक श्री. माणिकराव विठ्ठल माने यांनी १८ वर्ष सैन्यदलात तर २१ वर्ष महानगरपालिकेत सेवा केली याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने मा.अतिरिक्त आयुक्त श्री. उल्हास जगताप यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसदस्य प्रा. उत्तम केंदळे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर श्री. उदय जरांडे, जनता संपर्क अधिकारी श्री.प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post