व्हीएसआरएस मराठी न्युज – ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिक वाहने विभाग आणि आर.एम.आय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ईव्ही इकोसिस्टम कंपन्यांसह सहयोगी बैठकीप्रसंगी मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. शेखर सिंह यांनी मार्गदर्शन केले तसेच ई-ऑटो एक्स्पोच्या आयोजनाची पाहणी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. विजयकुमार खोराटे, श्री. उल्हास जगताप, सह शहर अभियंता श्री. संजय कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.अतुल आदे तसेच शहरातील विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, कार्यकारी अभियंता बापू गायकवाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे तसेच शहरातील रिक्षा संघटनांचे पदाधिकारी बाबा कांबळे,नितीन पवार (PCMC) यांचेसह इतर रिक्षाचालक तसेच काही महिला रिक्षा चालकही उपस्थित होत्या.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले रिक्षाचालकांच्या समस्यांचे आणि प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी वेळोवेळी पालिकेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल तसेच महापालिकेच्या वतीने ई-रिक्षा घेण्यासाठी चालकाला 30 हजार रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सीएनजी ऑटोच्या तुलनेत इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाकडे जाण्याच्या तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक परिणामांबद्दल रिक्षा संघटनांना जागरूक करणे हा या बैठकीचा उद्देश आहे.
या बैठकीत इलेक्ट्रिक ऑटोरिक्षाच्या आर्थिक व्यवहार्यता आणि इलेक्ट्रिक ऑटोकरिता भविष्यात वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. शहरामध्ये इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा घेण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना बँक तसेच आर्थिक संस्थांकडून करण्यात येणाऱ्या वित्तपुरवठ्याबाबत माहिती देण्यात आली.
Discussion about this post