व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -जगप्रसिद्ध ख्वाजा गरीब नवाज यांचा वार्षिक ८१२ वा उर्स ८ जानेवारी २०२४ रोजी ध्वजवंदन सोहळ्याने सुरू होईल. उद्या म्हणजेच सोमवारी बुलंद दरवाजावर उर्स ध्वजारोहण होणार आहे.
सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या ८१२ व्या उर्सचा ध्वजा सोमवारी संध्याकाळी दर्ग्याच्या बुलंद दरवाजावर फडकवला जाणार आहे. भिलवाडा येथील गौरी परिवार हा विधी करणार आहे. रजब चा चंद्र दर्शनाने उर्सची औपचारिक सुरुवात होईल. तत्पूर्वी सोमवारी, भीलवाडा येथील लाल मोहम्मद गौरी यांचा नातू फखरुद्दीन ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याच्या बुलंद दरवाजावर ध्वजारोहणाचा सोहळा पार पाडणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याने उर्सची औपचारिक सुरुवात होईल. ढोल-ताशांच्या गजरात दर्गा गेस्ट हाउस येथून ध्वज मिरवणूक काढण्यात येणार आहे. शाही कव्वाल कलाम सादर करत राहतील. उर्स ध्वज विविध मार्गांनी निघून निजाम गेट, शाहजहानी गेटमार्गे बुलंद दरवाजा येथे पोहोचेल. येथे गौरी कुटुंबीय ध्वजारोहणाचा सोहळा पार पाडतील.
सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा उर्स सुमारे 15 दिवस चालणार आहे. 12 किंवा 13 जानेवारीला चंद्राच्या दर्शनाने उर्सची औपचारिक सुरुवात होईल. त्यानंतर जन्नती दरवाजा उघडून धार्मिक विधी सुरू होतील.
दर्गा गेस्ट हाऊसपासून मिरवणूक सुरू होऊन लंगरखाना स्ट्रीट आणि निजाम गेटमार्गे बुलंद दरवाजा येथे पोहोचल्यावर सुफियाना कलाम आणि २५ तोफांची सलामी असेल. यावर्षी उर्समध्ये 2.50 ते 3.50 लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उर्स ध्वज तयार आहे. पुष्कर रोड अद्वैत आश्रमात असलेल्या ओमप्रकाश वर्मा आणि त्यांचा मुलगा सुभाषचंद्र यांचे कुटुंब 70 वर्षांपासून ध्वज तयार करत आहेत. पूर्वी ओमप्रकाश यांचे वडील गणपतलाल फलोदिया झेंडे शिवायचे.
अजमेर येथील दर्गा हजरत खाजा गरीब नवाज सरकारच्या 812 व्या उर्स निमित्त राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वतीने चादर पेश करण्यात आली आहे.
अजमेर शरीफ येथे हजरत खाजा गरीब नवाज यांचा उर्स मोठ्या उत्साहात दरवर्षी संपन्न होत असतो यावेळी संपूर्ण देशातील नागरिक अजमेर येथे दर्शनासाठी जात असतात.
शरद पवार यांच्या वतीने ही खाजा गरीब नवाज यांच्या दर्गा करिता चादर पेश करण्यात आली.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराचे ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, युवा नेते प्रशांत कापसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, उद्योजक सोफियान सिद्दिकी, आरिफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Discussion about this post