व्हीएसआरएस मराठी न्युज -श्री शादाबभाई खान युवा मंच काळभोरनगर आयोजित करण्यात आलेल्या काळभोरनगर बॅटमिटन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला स्थानिक खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत सहभागी 16 जोड्या खेळल्या व त्यातून अंतिम तीन संघाना पारितोषिक देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सर्व पारितोषिक श्री विशाल बाळासाहेब काळभोर पिंपरी विधानसभा अध्यक्ष रा.क्राॅ. पार्टी पिं चिं शहर जिल्हा यांच्या वतीने देण्यात आले होते .या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ श्री विशाल बाळासाहेब काळभोर प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र व श्री विष्णू चावरिया सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन मोकाशी यांनी केले व श्री शादाबभाई खान यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Discussion about this post