व्हीएसआरएस मराठी न्युज –संविधान दिनानिमित्त भोसरीतील बालाजीनगर येथील विश्वरत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तथागत बुद्ध विहार येथे सर्वांसाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे.
भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या संकल्पनेतुन हे वाचनालय सुरु करण्यात आले आहे. व्यसनाधिनता आणि नैराश्य यांच्या गर्तेत अडकुन भरकटलेल्या मुलांसाठी हे वाचनालय दिशादर्शक ठरणार आहे.
या वाचनालयात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा. आयपीएस तथा युपीएस ची परीक्षा देवुन अधिकारी कसे बनता येईल. याबाबत मोलाचे मार्गदर्शन करणारे पुस्तका व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ, शाहु महाराज, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योताबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, शहिद भगतसिंग यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी विविध पुस्तकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या सह सर्वहारा उत्कर्ष संघाचे बी. बी. शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संदिपान झोंबाडे, सागर ओरसे, संतोष निसर्गगंध, अँड. प्रशांत बुचुटे, सुरज गायसमुद्रे, सुनिता आठवले, हरि शिंदे, सुभाष बनसोडे, संगीता आव्हाड, सायराबानु सलीम शेख, नुरी भारती आदी मान्यवर उपस्थित होते.
संविधानाचे एकत्रित वाचन करीत शपथपूर्वक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Discussion about this post