व्हीएसआरएस मराठी न्युज –आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
आळंदी: दि.१९ आळंदीत आज संकष्टी चतुर्थी निमित्त माऊली मंदिरातील गणपती ,शिवतेज मित्र मंडळातील गणपती,जुन्या पुला खालील जय गणेश मंडळाच्या गणपती च्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी गेली होती.जय गणेश मित्र मंडळाने गणपती ला केळ्यांचे
घड महाप्रसाद म्हणून अर्पण केले होते.शिवतेज मित्र मंडळाने ३११ नारळाची आकर्षक अशी आरास गणपाती पुढे तयार केली होती.
गणपती पुढे सनई चौघडे यांचे सुमधूर वादन ठेवण्यात आले होते.रात्री पावणेआकरा वाजता गणपती महाअभिषेक व महाआरती होणार आहे.गणपती पुढे आरास केलेले नारळ (शहाळे) हे ससून रुग्णालयातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अन्नछत्र येथे रुग्णांना वाटण्यात येणार आहे. अशी माहिती
शिवतेज मित्र मंडळ्यांच्या सदस्यांकडून भेटली.
Discussion about this post