व्हीएसआरएस मराठी न्युज-आळंदी(ज्ञानेश्वर कुऱ्हाडे)
अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक समजला जातो.या सणा निमित्तानेच पहाटे पासून आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या समाधी दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
पहाटे ५:३० ते सकाळी १० वाजेपर्यंत अनेक भाविकांनी श्रींच्या चल पादुकांवर महापूजा केल्या. दुपारी ११:३० ते १२:३० यावेळेस श्रींना नैवद्य दाखवण्यात आला.दुपार नंतर मंदिरात फुलसजावट ही करण्यात आली.
ह .भ .प. श्री ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांचे सायं .४ ते ५ वेळेत ज्ञानेश्वरी प्रवचन करण्यात आले. स्वकाम सेवा व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने दुपारी २:३० ते
सायंकाळी ६ वाजे पर्यंत श्रींच्या उटी अवताराचे रूप साकारण्यात येत होते.यावेळेस माऊलींच्या समाधीवर चंदनउटी द्वारे श्री भगवान पांडुरंगाचे मनमोहक असे रूप साकारण्यात आले आहे.परंपरेने अक्षय तृतीय निमित्त माऊलींच्या समाधीवर चंदन उटी द्वारे श्रींचे अवतार रूप साकारण्यात येत असते. ते रूप पाहण्यासाठी व त्याचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची मंदिरात गर्दी होत असते.
सायं ५ ते ७ वेळेत कारंजा मंडपात हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आज शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने
अक्षय तृतीय निमित्त गणपतीच्या पुढे १हजार आंब्याची आरास करण्यात आली होती.
Discussion about this post