व्हीएसआरएस मराठी न्युज –आम आदमी पार्टीच्या वतीने रमजान ईद निमित्त आकुर्डी येथील मस्जिद व निगडी येथील मस्जिद समोर मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत शुभेच्छा देण्यात आल्या..
जातीय सलोखा राखण्यासाठी “आप”ने यंदा पुढाकार घेतला आहे. रमजान ईदची नमाज होताच आकुर्डी मशिद आणि निगडी मशिद समोर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या, हिंदू-मुस्लिम समाजात भाईचारा अबाधित रहावा यासाठी काही सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. त्यातच यंदा आम आदमी पार्टीने पुढाकार घेतला आहे. सर्वधर्मीय बांधव एकत्र असतील तरच समाजाचा विकास शक्य आहे. महाराष्ट्रात सर्वजण गुण्यागोविंदाने रहावे हे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. कोणालाही वाद-विवाद नको असतो. असे प्रतिपादन आप डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे यांनी केले.
यंदा प्रथमच आम आदमी पार्टीने पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये पुढाकार घेतला आहे. ईदची नमाज अदा केल्यानंतर प्रत्येक मशिदीसमोर आणि ईदगाह समोर आपचे कार्यकर्त्यांनी जाऊन मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या असे आप पिंपरी चिंचवड चे संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी म्हटले
आम आदमी पार्टीमध्ये सर्वधर्म समभाव या उक्तीप्रमाणे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असतात आम आदमी पार्टी कधीही जातीपातीचे राजकारण करत नाही असे आप शहर प्रवक्ते प्रकाश हगवणे यांनी म्हटले
यावेळी सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हाध्यक्ष वाहाब शेख, सामाजिक न्याय विंग शहर उपाध्यक्ष विजय आबड, आपतनपुर नेते अशोक तनपुरे, यांनीही शुभेच्छा दिल्या यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post