व्हीएसआरएस मराठी न्युज –पुणे: पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले धायरी गाव अजूनही विकासापासून वंचित आहे. यामध्ये प्रामुख्याने डीपी रस्त्यांचा विकसित न केल्यामुळे धायरीकर वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. यामुळे गावचा विकास खुंटलेला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या वतीने माजी उपसरपंच धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक व पुणे शहरचे कार्यध्यक्ष विजय कुंभार, राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे, जल हक्क आंदोलन समितीचे अध्यक्ष आबासाहेब कांबळे, शहर जनसंपर्क प्रमुख प्रभाकर कोंढाळकर, सुनीता काळे यांच्या सह परिसरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
धायरी गावात महत्वाचे असणारे डीपी रोड पुढील प्रमाणे
१) बेनकर नगर सर्व्हे.नं. ६ व ७ आणि ८ मधून ओढ्याला लागून जाणारा ६० फुटी डिपी रोड,
२) सावित्री मंगल कार्यालय ते लोकमत ऑफिस बिल्डिंग
३) काका चव्हाण बंगला ते ड्रॅन कंपनी सर्व्हे नं. ३० मधून जाणारा ते श्री कंट्रोल चौक डी पी रोड,
४) हायब्लिस सोसायटी ते लक्ष्मी लॉज नऱ्हेगाव आदी डिपी रस्ते रखडलेले आहेत. यातील बऱ्याच डी पी रस्त्यांवर सध्या अतिक्रमणे होताना दिसत आहेत.
Discussion about this post