व्हीएसआरएस मराठी न्युज –आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अनैतिक मानवी वाहतूक विभागाने अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 4 लाख 81 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
यामध्ये दोन लॅपटॉप आणि तेरा मोबाईलचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील साईबाबा नगर येथील धनश्री सिग्नेचर सोसायटीमध्ये असलेल्या एका बंद फ्लॅटमध्ये आयपीएल मॅचसाठी क्रिकेट बॅटिंग सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वसीम हनिफ शेख, इकरामा मकसूद मुल्ला, मुसबीत मेहमूद बशैब हे तिघे मोबाईलवर ऑनलाईन क्रिकेट खेळत असल्याचे आढळून आले. या छाप्यामध्ये ५ मोबाईल, १ लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल करण्यात आला. कोंढवा पोलीस स्टेशन क्र. 519/2023 अन्वये 420, 34 आयपीसी, जुगार प्रतिबंधक कायदा 4(अ) 5, भारतीय टेलिग्राफ कायदा 25(क) अंर्तगत पुढील तपास पोलीस करीत आहेत.
देशभरात आयपीएल क्रिकेटचे सामने पाहिले जात असून, सट्टेबाजीही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सट्टा लावणारे, ऑनलाइन सट्टा खेळणारे या दोघांवरही कारवाई करण्यात येत आहे. शहरातील अनैतिक मानवी वाहतूक विभागाला हिंजवडी परिसरातील मारुंजी येथे लखनौ सुपर जॉइंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली होती. यात वैभव बाबा राम डिक्कर इतर काही व्यक्ती ऑनलाइन सट्टा लावल्या प्रकरणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Discussion about this post