व्हीएसआरएस मराठी न्युज –
पिंपरी-चिंचवड परिसरातून भरदविसा गोळबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात दोन व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथून समोर आला आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. मावळ मधील गोळाबाराची घटना ताजी असताना आता पुन्हा भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोन्या तापकीर (वय-२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सोन्या तापकीर गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
Discussion about this post