व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १२ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध ठिकाणी ‘प्लॉगेथॉन’ (विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील नागरिक, संस्था आदींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.
यामध्ये ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमासह रक्तदान शिबिर, व्याख्यानमाला, ग्रंथोत्सव, प्रभातफेरी, प्लॉगेथॉन मोहिम आदी उपक्रमांचा समावेश आहे. शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी दि. १२ रोजी ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, दि. १३ ऑगस्ट रोजी ‘व’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, १४ ऑगस्ट रोजी ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय तर १५ ऑगस्ट रोजी ‘क’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ब्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून ‘एकदाच वापरासाठी असलेल्या प्लास्टिक विरोधी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे. नागरिकांना प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात येणार आहे. कापडी पिशवी वापराबाबत फळ, भाजी विक्रेते, टपरी, हातगाड्यावरील विक्रेत्यांमध्ये जनजागृती, ‘कापडी पिशवी सोबत सेल्फी’ मोहिम राबविण्यात येणार आहे.
‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमासह रक्तदान शिबिर, व्याख्यानमाला, ग्रंथोत्सव, प्रभातफेरी, प्लॉगेथॉन मोहिम आदी उपक्रमांचा समावेश आहे. शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी दि. १२ रोजी ‘अ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय, दि. १३ ऑगस्ट रोजी ‘व’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, १४ ऑगस्ट रोजी ‘ड’ आणि ‘इ’ क्षेत्रीय कार्यालय तर १५ ऑगस्ट रोजी ‘क’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात येणार आहे.
Discussion about this post