व्हीएसआरएस मराठी न्युज –पतंजलि योग समिती भोसरी विभाग व भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर* यांच्या वतीने दिनांक 21 जुन ते 26 जुन योग शिबिराचे आयोजन कै.भिमाबाई मडीगेरी उद्यान इंद्रायणी नगर येथे करण्यात आले होते.
सकाळी 5:00ते 7:00 यावेळत योग, ध्यान,आसने,सूर्यनमस्कार घेण्यात आले.यावेळी योग शिक्षक गुरूदास पाटील,दिलीप जाधव,कांतीलाल करपे, चंद्रकात गावडे यांनी मार्गदर्शन केले.योग शिक्षक कांतीलाल करपे योगाचे महत्व सांगताना ते म्हणाले योग म्हणजे शरीराचे अवयव, मनातील भावना आणि अध्यात्म यांचा समन्वय होय. योग आपल्या जीवनातील मानसिक ताण-तणाव कमी करून आपल्या शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण करतो. योग ही आध्यात्मिक वाट असून त्या वाटेवर चालून आपण आपले ध्येय गाठू शकतो. अर्थातच, ते ध्येय गाठण्यासाठी त्या वाटेवरचे नियम पाळावेच लागतील.
सात्त्विक जीवनशैली, संस्कारक्षम नियंत्रित मन आणि सात्त्विक विचार या तिघांचा एकत्रित परिणाम आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेच परिमाण देतो. जो मनुष्य या तीनही नियमांचा विचारपूर्वक उपयोग करतो, अर्थातच त्याचा स्वत:च्या मनावर पूर्णत: ताबा असतो. एकदा का त्याचे मन शांत झाले, की शरीरसुध्दा पूर्णत: त्याच्या ताब्यात असते.
योग करण्याने सात्त्विक वैचारिक पातळीचा उच्चांक गाठला जातो,असे ते म्हणाले
यावेळी मा.नगरसेवक राजेंद्र लांडगे ,योगेश लोंढे , शिवराज लांडगे , जयदीप करपे (उपाध्यक्ष-भाजपा युवा मोर्चा), गुरुदास पाटील (योग शिक्षक),कांतीलाल करपे,(योग शिक्षक)चंद्रकात गावडे (योग शिक्षक) नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला होता.प्रसाद देशमुख, राजेश चौधरी प्रशांत रासकर ,सचिन तेलोरे, विठ्ठल नवाने, प्रशांत देशपांडे, पंढरीनाथ घोड़के ,कृष्णा तावरे, दादा वाकचौरे, जावळे काका,विजय गोरडे,संजय मांजरे, शंकर मेमाने,अशोक भोर,बाळशीराम बांगर, बबन वाडेकर, बालाजी ढगे, मच्छिंद्र मगर, उद्योजक रामदास जैद,सौ.निर्मला उगले, सौ माधुरीताई जिड्डीमणी,पंढरीनाथ घोडके,कृष्णजी तावरे व इ.उपस्थित होते.
Discussion about this post