व्हीएसआरएस मराठी न्युज -मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत पक्षाच्या ३८ आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला विरोध केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारवर संकट उभं राहिले आहे. यात संजय राऊत बंडखोर आमदारांवर सातत्यानं निशाणा साधत आहेत. दरम्यान, आता संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे.
राज्यात सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचला असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आलंय. संजय राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेशही देण्यात आलेत.
उद्या म्हणजेच २८ जून दिवशी सकाळी ११ वाजता संजय राऊतांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने याआधी संजय राऊतांना समन्स बजावलं होतं.
यापुर्वी ईडीकडून संजय राऊतांचा अलिबागमधील प्लॉट आणि दादरमधील फ्लॅट जप्त केला होता. ईडीने राऊत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचीही चौकशी केली आहे. यामुळे ईडी यावेळी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Discussion about this post