व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरीचिंचवड महानगरपालिकेची स्थापना ११ ऑक्टोबर १९८२ रोजी झाली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४० वर्षातला प्रवास प्रगतीच्या दिशेने जाणाराच आहे मग सुरवातीला या शहराची औद्योगिक शहर ओळख होती या महानगरपालिकेने अल्पावधीत मोठी प्रगती केली आहे. औद्योगिक नगरी व आयटी हब म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर लाखो कामगारांना उपजीविका पुरवते.
पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना लोकनेते आण्णासाहेब मगर यांनी ४ मार्च १९७० साली पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी-निगडी ही गावे एकत्र करून केली. शासकीय समितीने १९७० ते १९७८ पर्यंत कारभार केल्यानंतर २० मार्च १९७८ मध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाली डॉ. श्री. श्री. घारे यांना पहिले लोकनियुक्त | नगराध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान मिळाला त्यानंतर १९ ऑक्टोबर १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यानंतर लोकसंख्येच्या निकषानुसार या नगरपालिकेचे महानगरपालिकेत रुपांतर केले. यावेळी काही नविन गावे समाविष्ट केली. या महानगरपालिकेची पहिली निवडणूक १९८६ साली झाली त्यानंतर १९९२, १९९७, २००२, २००७, २०१२, २०१७ साली पंचवार्षिक निवडणुका झाल्या.
आशिया खंडातील श्रीमंत पालिका म्हणून शहराला लौकिक मिळाला आहे. ३९ वर्षांच्या या वाटचालीत शहराने ग्रीन सिटी, बेस्ट सिटी, क्लीन सिटी, स्मार्ट सिटी अशी बिरुदे मिळवल्यानंतर आता पिंपरी चिंचवड शहराची मेट्रो सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९८६ साली झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्नींनी हे पद भूषवले आहे. आर. एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या होत्या.
वर्धापन दिन विशेष…
सकाळी १०.०० वा.
नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणे
सकाळी १०.१० वा.
रक्तदान शिविर महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत
सकाळी १०.३० वा.
न्यू होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा हा खास महिलांसाठी कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची, रस्सीखेच स्पर्धा
कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन “चला निरोगी जगूया” सादरकर्ते – डॉ. शिवरत्न शेटे (एम डी. आयुर्वेद)
दुपारी १२.०० वा.
उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी व स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
दुपारी २.०० वा.
अधिकारी कर्मचारी यांचा ओर्क्रेस्ट्रा होणार आहे.
Discussion about this post